✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.29 सप्टेंबर) :-
महागाव तालुक्यामध्ये नव्याने रुजू झालेले रोहित शिंदे परिविक्षाधीन तहसीलदार यांनी रेती माफिया वर धडक कारवाई करून आज दोन ट्रॅक्टर जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्याची कार्यवाही केली आहे, या कार्यवाहीमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्गदर्शनात एक पथक तयार करण्यात आले. त्या पथकाचे नेतृत्व वैभव पवार निवासी नायब तहसिलदार महागाव हे करीत आहेत. मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे, ग्रा.म. अधिकारी निलेश आखाडकर, महसुल सेवक सुरज लोणकर, देवानंद फोफसे, दिपक वैरागडे,सदानंद जराड यांच्या पथकाने महागाव येथुन अवैधरीत्या रेती चोरून नेणारे वाहन पकडुन पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालय महागाव येथे लावण्यात आले आहे. सदर कार्यवाही 29 सप्टेंबर रोजी सायं 6:15 वाजता करण्यात आली आहे.







