🔸सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांची भीती दूर झाली
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.25 सप्टेंबर) :-
महागाव तालुक्यातील पिंपरी शेत शिवारात शेतकरी नेते जगदीश नरवाडे यांच्या शेतात मंगळवारी सकाळी तब्बल साडेआठ फूट लांबीचा व अंदाजे २० किलो वजनाचा जिवंत अजगर (आर) आढळून आला.
ग्रामस्थांत या अजगरामुळे भीती निर्माण झाल्याने शेत परिसरामध्ये मजूर वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली.
अचानक जिवंत अजगर दिसल्याने ग्रामस्थांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. काही काळ गावात भीतीचे वातावरण पसरले होते.
सर्पमित्रांना माहिती कळविण्यात आली. त्या मुळे सर्पमित्रांनी आपले कौशल्य वापरीतअजगरास सुरक्षित पकडले आहे. या वेळी सर्पमित्र गजानन येरवाळ, करण येरवाळ, मंगेश येरवाळ, कृष्णा भेलके, आकाश चव्हाण, चेतन चौरे व पांडु राठोड चंदन सर यांच्यासह सर्पमित्रांचे यावेळी ग्रामस्थांनी शौर्याचे आणि दाखविलेल्या स्पर्धेचे मनापासून कौतुक केले. सर्पमित्रांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला पकडून सर्पमित्रांनी वनविभागाच्या मदतीने अजगराला पकडून जंगलात सोडण्यात आले.
वनविभागाचा सल्ला – घाबरू नका
( ‘अजगर’ हे निरुपद्रवी साप आहेत. ते प्रामुख्याने उंदीर, ससे व लहान प्राण्यांच्या भक्षणावर जगतात. मनुष्याला याचा धोका नसतो. अशा वेळी ग्रामस्थांनी घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा.)डि.के. मुनेश्वर, वनपरिक्षेत्र, अधिकारी महागाव.







