✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि .21 सप्टेंबर) :-
महागाव तालुका शासकीय कंत्राटदाराची नवीन कार्यकारणी झाल्यानंतर प्रथमच महागाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर रविवारी विचार विनिमय बैठक घेण्यात आली. त्या मध्ये अनेक शासकीय निमशासकीय कामाविषयी आढावा घेण्यात आला. विचार विनिमय बैठकीमध्ये काही खास मुद्द्यावर चर्चा झाली, या मध्ये महागाव तालुक्याच्या बाहेरील कंत्राटदारांना महागाव तालुक्यातील कामे देण्यात येऊ नये. तालुक्यातीलच कंत्राकदारांना कामे मिळावेत जेणेकरून आपल्या तालुक्यातील विकास कामे चांगली व दर्जेदार होण्यास मदत होईल.
महागाव तालुका शासकीय कंत्राटदारा संघटनेच्या पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या बैठकीत तांडावस्ती, दलितवस्ती, पंधरावा वित्तआयोग, खनिजकर्म निधी, स्थानिकनिधी, रोजगार हमी योजनेंची कामे तालुक्यातील संघटनेच्या कंत्राटदारांना देण्यात यावे. तालुक्यात बाहेरच्या कंत्राटदारांचा महागाव तालुक्यातील कामात प्रचंड शिरकाव होत असल्याने स्थानिक कंत्राकदारांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे बाहेरचे कंत्राटदार मनमानी पद्धतीने कामे करून विकास कामात एक प्रकारे खिळ घालण्याचे काम करत आहेत. बाहेरील कंत्राट दाराचा कामाचा दर्जाही निकृष्ट असल्याने अल्प काळातच कामाची वाट लागल्या जात आहे.
जर आमदार, खासदार व सरपंच यांनी महागाव तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत चर्चा करून जास्तीत जास्त संघटनेला कामे मिळवून द्यावीत, अशा पद्धतीची विचार विनिमय कंत्राटदारातून करण्यात आला. या वेळी महागाव तालुका शासकीय कंत्राटदार संघटनेचे मार्गदर्शक आरिफ सुरैया, कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, ताहेर मौलाना, गुट्टे गुरुजी, गोपाल सुरवसे, प्रनय करे, सज्जाद खान, बबलू मिश्रा,अनिल चव्हाण, धीरज गावंडे, पवन मस्के, गजानन चव्हाण, नितीन राठोड, तारीख खान, कैलास मोहिते, विनोद खोडे, समीर नवाब, किशोर आडे, नितीन राठोड आदी कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.







