सचिन डोहे यांचा वाढदिवस बाळू किट भेट देऊन साजरा

🔸बाळू फाऊंडेशन च्या Be A Part of Loving Unit ला हातभार

✒️ सौ.सुवर्णा बेले राजुरा ( Rajura प्रतिनिधी) 

राजुरा(दि .21 सप्टेंबर) :- 

     सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे भारतीय जनता पक्षाचे राजुरा शहर महामंत्री सचिन डोहे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजुरा येथील सोमनाथपूर वार्ड अंगणवाडी क्रमांक ६ येथे तीन बालकांना पोषण आहार ची बाळू किट भेट देण्यात आली.

याप्रसंगी सचिन डोहे , अमित महाजनवार, अध्यक्ष बाळू फाउंडेशन, अक्षय सुर्तेकर, लखन जाधव, प्रदीप जाधव, आकाश गंधारे, जुगल डोहे, आकाश जाधव, अंगणवाडी सेविका माया काशेट्टीवार , माधुरी बोबडे, गुरनुले आदींची उपस्थित होती. बाळू फाउंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण राजुरा शहर कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न करू असे सचिन डोहे यांनी यावेळी सांगितले. तसेच डोहे यांनी यापूर्वी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षभेट , वृक्षकुंडी भेट, शैक्षणिक साहित्य भेट असे विविध उपक्रम राबविले त्याबद्दल बादल बेले यांनी त्यांचे अभिनंदन केले.