✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.2 सप्टेंबर) :- महागाव पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी या साठी महागाव पोलीस प्रशासना कडून प्रभावी पथसंचलन घेण्यात आले. महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात महागाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतून पोलिसांनी पथसंंचलन केले. महागाव तालुक्या मध्ये प्रसिद्ध असलेली बाजारपेठ फुलसांगवी, सवना या ठिकाणी मुख्य बाजारपेठ परिसरात, प्रमुख मार्गावरून पथसंंचलन घेण्यात आले.
धार्मिक सण उत्सव काळामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब निर्माण व्हावी. या साठी पोलिसांद्वारे या पथसंचलन करण्यात आले.पथसंचलन महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन यशस्वीरीत्या पार पडले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील अंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरस्वती राठोड, पोलीस इन्स्पेक्टर अमोल राठोड, एसआरपीएफ गट क्र. 13, सीआरपी पथक उमरखेड, गृहरक्षक दल महागाव तसेच महागाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उत्साहाने पोलीस पथ संचलनात सहभागी झाले होते.
(धार्मिक सण अथवा उत्सव काळामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सदैव सज्ज असते.
या पथसंचलना मुळे परिसरात शांतता, सुरक्षितता व सलोखा टिकवण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला. जनतेनेही धार्मिक प्रसंगी सलोखा बाळगत पोलिसांना प्रतिसाद घ्यावा. शांतता अबाधित राहण्यासाठी महागाव पोलिसाद्वारे आव्हान करण्यात येते.)….धनराज निळे,पोलीस निरीक्षक, महागाव पोलीस स्टेशन







