✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.1 सप्टेंबर) :- राजे मित्र मंडळाच्या वतीने काल दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात वितरण करण्यात आले. प्रसंगी फुलसावंगी येथील जुन्या गणेश मंडळाचे मुस्लिम धर्माचे अध्यक्ष ज्यांनी हिंदू मुस्लिम एकता जोपासत गणेशोत्सवा दरम्यान गावात नवा आदर्श निर्माण केला होता. अध्यक्ष राजे मित्र मंडळ फुलसावंगी यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.
गावात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रेरणा देणारा संदेश राजे मित्र मंडळ फुलसावंगी यांच्याकडून देण्यात आला. अध्यक्ष म्हणून नूरखान रहीम खान,शेख मुसताक शेख छोटू,याकूब खान नवाज खान,शेख जमाल शेख बाशा,शेख इसाक शेख इब्राहिम, यांचा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी नूर खान यांनी या प्रसंगी आलेले अनुभवाची जाणीव करून दिली.शेख इसाजी यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. गणेश मंडळाचे सदस्य शरद प्रतापवार यांनी सुद्धा जुन्या आठवणीना उजाळा दिला. व सर्व धर्म समभावाचा संदेश दिला.त्यानंतर धनंजय शेळके व प्रमोद शेळके ,महाराणा प्रताप गणेश मंडळाचे अध्यक्ष संदेश मुत्तेपवार यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाची स्तुती केली.
यावर्षीच्या महाप्रसादाचे आयोजक विनोदभाऊ सोरते, सुरेंद्र लकडे ,अरुण धकाते यांचेसह गावातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येत मुस्लिम समाजातील इस्माईल खान,बाबूभाई पोस्टमन,सयद वाजीद,शमी पठाण,शेख कलिम आदी नागरिक व भाविक भक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच कुणाल नाईक यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल सोनुने तर आभार धनंजय शेळके यांनी केले.







