🔹01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन कापूस विक्री नोंदणी करण्याचे महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आव्हान
✒️विश्वनाथ महामुने महागाव ( Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि .31 ऑगस्ट) :- तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता घरबसल्या आपल्या मोबाईल ॲपद्वारे कापूस विक्रीनोंद करता येणार आहे. या बाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना तातडीने ‘कपास किसान’ॲप घेऊन प्रगत तंत्रज्ञानाने ऑनलाईन आपल्या मोबाईल मधुनच घरबसल्या कापूस विक्री कधी करावी हे निश्चित करता येणार आहे. त्यासाठी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ॲप घेण्याचे महागाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाद्वारे आव्हान करण्यात आले.
शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्लेस्टोअर द्वारे ‘कपास किसान’ॲप डाऊनलोड करावे लागेल. आपला मोबाईल क्रमांक नोंदवून झाल्यानंतर ओटीपीद्वारे लॉगइन करावे. त्या नंतर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करावे. त्या मध्ये आपले नाव,आधार कार्ड प्रमाणे लिंग जन्मतारीख, प्रवर्ग, आधार क्रमांक, पत्ता व इतर आवश्यक माहिती भरायची आहे. नोंदणी करतांना आपले आधार कार्ड, जमिनी बाबतचे दाखले, गाव नमुना सातबारा उतारा 2025/2026 या वर्षा करीता कापसाचा पेरा नोंद असलेले, बँक पासबुकचा पहिल्या पानाचा स्पष्ट दिसेल असा स्वतःचा फोटो असलेल्या भागाचे छायाचित्र असावे लागते. ही प्रक्रिया पूर्ण करावी इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन हे बटन दाबून प्रक्रिया पूर्ण करावी.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी यशस्वी पूर्ण झाल्याचा संदेश येईल,म्हणजे नोंदणी प्रक्रिया झाली आहे असे समजावे. या नंतर आपण आपले इतर जमिनीचा तपशील वाढीव क्षेत्र या ऑप्शनद्वारे अँड करू शकता किंवा वाढवू शकता. राज्य शासना कडून पडताळणी झाल्यानंतर आपल्याला संदेश येईल. त्या नंतर आपणाला कापूस केव्हा विक्रीसाठी आणायचा ती तारीख व वेळ याच ॲप मधील बुकस्टॉल द्वारे निश्चित करता येईल.तुम्ही निश्चित केलेल्या तारखेला, वेळेला कापूस विक्रीसाठी आणावा. जर तुम्हाला काही अडचण आल्यास तारीख व वेळ या मध्ये तुम्ही फक्त दोन वेळा दुरुस्ती करू शकाल. या साठी सर्व कापूस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींना ऑनलाइन कपाशी विक्रीचा व्यवहार सुलभ व्हावा या हेतूने कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव संचालक मंडळाद्वारे सूचना करण्यात आल्या.
शेतकऱ्यांनी सूचने नुसार आपण घरबसल्या आपला कापूस विक्रीसाठी 01 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंब 2025 या महिनाभर कालावधीत आपले नाव नोंदणी करून घ्यावी. या संदर्भात काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासी संपर्क करावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गुलाबराव लोभा जाधव आणि संचालक मंडळांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.







