महागाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षणाकडे वाढता कल

🔹 मुडाणा गावातुन शंतनु वानखेडे एमबीबीएस करणारा पहिला विद्यार्थी

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.31ऑगस्ट) :- मुडाणा येथील शंतनु वानखेडे या विद्यार्थ्याची एमबीबीएस करीता निवड झाली. तो मुडाणा गावातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. विभागातून अवघड मानली जाणारी पूर्व परीक्षेत यशस्वी वाटचाल शंतनु वानखेडे या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस  अभ्यासक्रमाकरिता निवड झाली आहे.

     महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रास्तभाव धान्य दुकानदार बाबाराव वानखेडे यांचा नातु शंतनु गजानन वानखेडे यांचा शासकीय आरक्षित जागेमध्ये नगर येथील विखे पाटील मेडिकल कॉलेज या ठिकाणी एमबीबीएस वैद्यकीय शिक्षणाकरिता नंबर लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारचे शिक्षण घेणारा मुडाणा गावातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. विद्यार्थ्यांची मनोबल वाढावे, त्यांना चालना मिळावी, पुढील यशस्वी वाटचाली करिता शंतनु वानखेडे या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन करण्यात आले.

त्याच्या या यशा बद्दल विदर्भ जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे, महागाव वार्ताचे संपादक विजय सुर्यवंशी, महागाव पोलीस स्टेशनचे रायटर वसिम पठाण यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन शंतनू वानखेडेचा मुडाणा येथील एका छोटेखानी कार्यक्रमा प्रसंगी सत्कार केला. यावेळी नरवाडे व वानखेडे परिवारातील सदस्य गंगाबाई बाबाराव वानखेडे, सौ.भाग्यश्री गजानन वानखेडे, सिंधूताई नरवाडे, सौ. रसिकाताई जगदीश नरवाडे ह्या उपस्थित होत्या.