महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटाने शेतकरी पार कोलमडून गेला

🔹शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या साठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांची राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या कडे मागणी

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव (दि.30 ऑगस्ट) :- उमरखेड महागाव तालुक्यात 16 ते 19 ऑगस्ट नंतर परत 25 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रचंड प्रमाणातील अतिवृष्टीने शेतकरी कमालीचा हातबल झाला. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच इसापूर धरण, वेणी आधरपुस धरणातुन सोडलेल्या भरमसाट पाण्याने, निर्माण झालेल्या महापुराने पैनगंगा नदी क्षेत्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतीचे, शेतजमिनीचे व घराचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या मागणीसाठी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्याकडे मागणी केली. 

    यावेळी काँग्रेसचे नेते,माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे, तातूजी देशमुख, राम देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडें सह सर्वच प्रमुखांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरतेने असल्याचे सांगत.

शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तत्काळ 1 लाख रुपये शेतकऱ्यांना द्यावे, सोबतच सरसकट मदत करण्याच्या मागणीसह,सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करावा. इसापूर धरणाच्या पाणी सोडण्याच्या पद्धतीत दुरुस्ती करावी. या सह अनेक मागण्यांचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे साहेब यांनीही नुकसान ग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी या साठी जिल्ह्याचे पालक मंत्री मा. ना. संजय भाऊ राठोड यांना तथा राज्य शासनाला शिष्टमंडळासह भेटून मागण्यांचे निवेदन दिले.

 मा. ना. मंत्री इंद्रनील मनोहरराव नाईक साहेब (राज्यमंत्री) यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनातं भेट घेऊन पुन्हा सर्व मागण्यांचे निवेदन दिले. उमरखेड महागाव मधील नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवाना तात्काळ मदत देऊन न्याय द्यावा, अशी साहेबराव कांबळे यांनी मागणी केली.