सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने वृक्षारोपणासह विविध उपक्रम

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव (दि.30 ऑगस्ट) :- शहरातील सिद्धिविनायक गणेश मंडळ प्रतिष्ठान प्रभाग क्र. ६, महागाव यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मध्ये २९ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.”एक वृक्ष लावू या, निसर्गाला साथ देऊया, या अशा प्रेरणादायी संकल्पनेतून आरोग्यदायी जीवन आणि पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आला.

    या कार्यक्रमातनगरपंचायत नगराध्यक्षा सौ. सुनंदा कोपरकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक विशाल पांडे, जगदीश नरवाडे, अमोल राजवाडे, निलेश नरवाडे, बाळू वाकोडे, धम्मानंद कावळे, नितीन नरवाडे,अमोल आवटे, नगरसेविका जयश्री इंगोले यांच्यासह सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिद्धिविनायक प्रतिष्ठान फक्त पर्यावरणपूरक उपक्रमच नव्हे, तर शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही आपले योगदान देत आहे. शनिवार ३० ऑगस्ट रोजी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ घेण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थी व पालकांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन करण्यात आले.३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी आणि आपत्ती काळात गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणाऱ्या महागाव शहरातील उपक्रमात नागरिकांनी, युवकांनी, पालकांनी व सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी केले आहे.