🔸भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पछाडा वर्ग ओबीसी मोर्चा सह विविध संघटना उतरणार रस्त्यावर
✒️ यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.13 मार्च) : ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ करावी, यूजीसी अधिनियम सख्तपणे लागू करावा तसेच 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून वगळावे या प्रमुख मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. चार चरणात होणाऱ्या चरणबद्ध आंदोलनाचे पहिले चरण यवतमाळ येथे पार पडले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, देशात अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर घटकांची विविध प्रकारे गणना केली जाते, मात्र ओबीसी समाजाची शेवटची जातनिहाय जनगणना 1931 साली झाली. त्यानंतर आजपर्यंत ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या निश्चित होत नसल्याने त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व, शैक्षणिक सुविधा आणि आर्थिक बजेट निश्चित करणे कठीण होत आहे.
तसेच यूजीसी अधिनियम सख्तपणे लागू केल्यास उच्च शिक्षण संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय व भेदभाव रोखता येतील, असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले. रोहित वेमुला आणि पायल तडवी यांसारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत यासाठीही हा कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय राईट टू एज्युकेशन (RTE) कायद्यांतर्गत घेतली जाणारी टीईटी परीक्षा 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर लागू करू नये, अशीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनात सुनील गवई (जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा), भुवन मुनेश्वर (प्रदेश अध्यक्ष, भारतीय बेरोजगार मोर्चा), बिमोद मुधाने (लोकसभा प्रभारी, बहुजन मुक्ती पार्टी – यवतमाळ-वाशिम), सुरेंद्र परडके जिल्हा संयोजक, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा, रोषना आडे जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ, राष्ट्रीय किसान मोर्चा संयोजक अरविंद पाटील, RMBKS चे जिल्हा अध्यक्ष दिलीप जवादे, गुरू रविदास क्रांती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष गजानन गोडवे, सुधाकर वाघमारे, वासुदेवराव शेंडे, राजेश भुजाडे,देवराव साठे, विनोद भगत, प्रवीण खोब्रागडे, युवराज आडे, गौतम बागेश्वर, उत्तमराव बनसोड, संगम खोब्रागडे, वसंत देवतळे, रमेश कांबळे,प्रकाश वावरे, गोविंद ढोमणे, दादाराव भाजीखाये,दिनेश कुंबरे, अरुण गोसावी, नितीन पाईकराव, उत्तम भुजाडे, देविदास फुपरे,निखिल गायनार,लीना मेश्राम,अमिता मेश्राम, ज्योती कांबळे, प्रभाकर सावळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सांगितले की यापुढील टप्प्यात जिल्हास्तरीय भव्य रॅली काढण्यात येणार असून 23 एप्रिल रोजी देशभर ‘भारत बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.







