✒️यवतमाळ(Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.20 फेब्रुवारी) :-
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा आयोजित २२ फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी नागपुर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या विशाल महामोर्चास प्रसिद्धी देणेबाबत….
*🏵️पार्शभुमी*🏵️
२६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ अखेर ४५ वे बामसेफ व १५ वे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा राज्यातील कटक येथील “बाली यात्रा मैदान” येथे *मा.वामन मेश्राम साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला लागणा-या सर्व परवानग्या शासन प्रशासनाकडुन मिळालेल्या होत्या.या तयारीसाठी संघटनेने करोडो रुपये खर्च करुन अधिवेशनाची तयारी पुर्ण केली होती. या अधिवेशनाला उपस्थित रहाण्यासाठी शेकडो कार्यकर्ते अधिवेशन स्थळी पोहोचले होते,तर हजारो कार्यकर्ते रस्त्यात व येण्याच्या तयारीत असताना अचानक कटक प्रशासनाने स्थानिक आर.एस.एस.व भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अधिवेशनाच्या सर्व परवानग्या रद्द केल्या…..यामुळे अधिवेशन होऊ शकले नाही.*संविधानात अंतर्भूत असलेल्या १९ (अ)(१)(२) (३) या मुलभुत अधिकारांचे हनन करण्यात आले….*
*🟣राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुर येथील मुख्यालयावर विशाल महामोर्चाची घोषणा…*
आर.एस.एस.व भाजपा असे संविधानविरोधी प्रकार वारंवार करीत आहे. या विरोधात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष *मा.वामन मेश्राम साहेब* यांनी ४ चरणात आंदोलन घोषित केले…
चौथ्या चरणाअंतर्गत नागपुर येथे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपुर येथे संघ मुख्यालयावर महामोर्चाचे आंदोलन होणार आहे….या आंदोलनाला भारतातील मुलनिवासी बहुजन समाजातील सामाजिक ,धार्मिक,शैक्षणिक,शेतकरी,असंघटित कामगार संघटना,भाजपा वगळता अनेक राजकीय पक्षांचे समर्थन मिळत आहे,अनेकांनी समर्थनपत्र देखील दिलेले आहे.लाखो बंधु व भगिनी या विशाल महामोर्चात सहभागी होणार आहेत….
*🟣नेतृत्व*🟣
या विशाल महामोर्चाचे नेतृत्व *भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब* व राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे *राष्ट्रीय अध्यक्ष -चौधरी विकास पटेल साहेब* हे सह नेतृत्व करणार आहेत. ही महारॅली संविधान,लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असुन भारतीय नागरिकांना जे संवैधानिक मुलभुत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचे हनन होऊ नये व मुलनिवासी बहुजन समाजाच्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित रहावे यासाठी या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे….
*या मुद्द्यांवर महारॅलीचे आयोजन—-*
१) ओरिसा राज्यातील कटक येथे होणारे व रद्द करण्यात आलेल्या अधिवेशनास परवानगी देण्यात यावी यासाठी….
२)ओबींसी सहित सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी…..
३) भारतातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन वर घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी….
४) संविधानाने दिलेल्या मुलभुत अधिकारांना संरक्षण मिळावे यासाठी…
५)या अधिवेशाच्या तयारीसाठी संघटनेला,येणा-या,आलेल्याप्रतिनिधिंना व कार्यकर्त्यांना आलेल्या खर्चाची भरपाई मिळावी यासाठी…..
६)मुलभुत अधिकारांचे रक्षण करण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या ओरिसा राज्यसरकारला अनुच्छेद ३५६ अन्वये बरखास्त करण्यात यावे यासाठी….. पत्रकार परिषदेमध्ये भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ ,भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय किसान मोर्चा शाखा यवतमाळ जिल्हा मधील विविध पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.







