दत्तात्रय पिंपळापुरे यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन

 ✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी) 

चिमूर(दि.20 फेब्रुवारी) :-

         चिमूर नगरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. दत्तात्रय गणेश पिंपळापुरे (वय ९७ वर्षे) यांचे अल्प आजाराने तसेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

        चिमूर शहरात ते “दादाजी” या नावाने सर्वपरिचित होते. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून त्यांनी कार्य केले. राम मंदिर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. आणीबाणीच्या काळात त्यांनी तब्बल १७ महिने कारावास भोगला. संघाची शिस्त, विचारांशी एकनिष्ठता आणि समाजकार्याची तळमळ हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. सुमनताई पिंपळापुरे, मुलगा श्रीपाद पिंपळापुरे, सून व चार मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.

         त्यांचा अंत्यविधी दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता चिमूर येथील नेहरू विद्यालयामागील कवडसीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या स्मशानभूमीत संपन्न झाले.