✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.30 जानेवारी) :-
विमान अपघातात लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह माहूर तालुकाही शोकसागरात बुडाला.गुरुवार दि. 29 जाने.रोजी दादावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यादिवशी माहूरकरांनी व्यापारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विमानाला अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी माहूर तालुक्यात पसरली, प्रत्येक व्यक्ती सन्न झाला.सायं.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपानेते डॉ.निरंजन केशवे,विजय आमले,ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान,वसंत कपाटे,रा.काँ. (शरद पवार )चे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, रा. काँ.चे शहराध्यक्ष सईद अली आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी नंदकुमार जोशी,अविनाश टनमने पत्रकार शंकर भालेराव अंबादास मुकटे शेख रफिक ईलास बावाणी,राजू दराडे. संतोष रेकूलवार,डी. के.जोशी,राज ठाकूर,सुरेश गिऱ्हे, सचिन जासूद, संजय घोगरे, अशोक उप्पलवाड आदींची उपस्थिती होती.







