बादल मेश्राम हत्या प्रकरनात एका संशयिताचा मृत्यू, दोन आरोपी अटकेत

✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.27 जानेवारी) :- 

      भिसी येथील बादल ज्ञानेश्वर मेश्राम (वय २२) यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणातील एका संशयिताचा मृत्यू झाला आहे, तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

       बादल मेश्राम बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या आईने भिसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे संशय बळावला. पुढील तपासात आरीफ उस्मान खान पठाण (वय २४) व सौरभ सुभाष चौधरी (वय २२) यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींना चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. 

           पोलिस अधीक्षक मुक्कामा सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगडे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वाघ. भारत थिटे. पोलिस शिपाई सतीश झिल्पे. राजू बावणे व भिसी पोलीस तपास करीत आहेत.