मौजा कुरूड येथे ‘संगीत छड’ नाट्यप्रयोगाचे भव्य आयोजन

✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.24 जानेवारी) :- 

मौजा कुरूड, तालुका चामोर्शी येथे ‘संगीत छड’ या नाट्यप्रयोगाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नाट्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री रविंद्र भाऊ वासेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष डॉ. सौ. सोनल ताई कोवे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव मा. श्री कपिल भाऊ बागडे, अध्यक्ष जंग. का गडचिरोली तथा माजी सदस्य जि. प. गडचिरोली मा. श्री पूर्णचंद्रराव जी. रायशिदाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मा. श्री तानाजी ढोडरे, ग्रामपंचायत कुरूडचे उपसरपंच मा. श्री बाबुराव जी. शेंडे, सरपंच मा. श्री विनोद भाऊ मडावी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. मा. श्री तामदेव जी. दुधबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘संगीत छड’ या नाटकाने प्रेक्षकांचे मन जिंकत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून दिला.