✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.19 जानेवारी) :-
जिल्हा वार्षिक योजना (२०२५-२६) अंतर्गत ‘जन सुविधा’ निधीतून बोदली येथे दोन नवीन सिमेंट काँक्रीट (CC) रस्त्यांचे भूमिपूजन आज पार पडले.
गावातील अंतर्गत रस्ते पक्के आणि मजबूत असावेत, जेणेकरून ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल, हाच आमचा ध्यास आहे. दिलेला शब्द पाळत आणि विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवत आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा सचिव श्री. रत्नदिपजी म्हशाखेत्री, श्री. विलासजी खेवले, सरपंच श्री. आकाशजी निकोडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाचा विकास, हाच आमचा ध्यास







