माहूर तालुका विधी सेवा समिती व अभियोक्ता संघ माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर वझरा (शे.फ.)येथे संपन्न

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

(दि.18 जानेवारी) :- माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद या गावात आज रोजी कायदेविषयक शिबिर माहूर तालुका विधी सेवा समिती व अभियोक्ता संघ माहूर यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले, यावेळी सर्वप्रथम न्यायाधीश बी.ए.अग्रवाल साहेब यांचे प्रथम नागरिक माननीय दीपक केंद्रे सरपंच वझरा शे.फ.यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले,यावेळी आलेल्या मान्यवरांचे प्रमुख व्यक्तींच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी सर्वप्रथम अभियोक्ता संघाचे ॲड. ए .एम.ढगे साहेब यांचे मनोगत पर भाषण झाले.

त्यांनी वाढती गुन्हेगारी व त्यावरील उपाय यावर आपली मत मांडली त्यानंतर माहूर न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय बी.ए .अग्रवाल साहेब यांनी आपले हक्क आणि अधिकार यावर आपले मत मांडले त्यानंतर मा.मुरादे साहेब (गटविकास अधिकारी पंचायत समिती) माहूर यांनी आपल्या मनोगणातुन बालविवाह प्रतिबंध कायदा यावर सविस्तर माहिती देऊन बालविवाह आम्ही गावकरी करणार नाही अशी सर्वं गावकऱ्यांकडून प्रतिज्ञा करून घेतली.

या कार्यक्रमाला माहूर न्यायालयाचे न्यायाधीश बी.ए.अग्रवाल साहेब ,मा. मुरादे साहेब (पंचायत समिती माहूर), ॲड. ए. एम .ढगे ,ॲड. जी .व्ही.अडकिने, ॲड. पी.पी. टेपकर ,ॲड. बी.एम.चव्हाण, पी.एस.गोवंदे वरिष्ठ लिपिक न्यायालय माहूर ,आर.यु.चव्हाण शिपाई, पो. कॉ. श्याम चव्हाण, सरपंच दीपक केंद्रे, ग्रामविकास अधिकारी कराड साहेब, ग्रामपंचायत ऑपरेटर दीपक मुंडे व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन सय्यद इसा सर (पत्रकार) यांनी केले तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मानले.