✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.18 जानेवारी) :-
एकलव्य कबड्डी क्लब, वालसरा यांच्या वतीने भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता या स्पर्धेचे उद्घाटन मा. महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, अध्यक्ष, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते पार पडले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी सांगितले की, खेळ हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कबड्डीसारख्या खेळामुळे शरीराचा सर्वांगीण व्यायाम होतो, ज्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते. तसेच युवकांमध्ये शिस्त, संघभावना व आत्मविश्वास निर्माण होतो.
ग्रामीण भागातील युवकांनी मोबाईल व अपायकारक सवयींपासून दूर राहून खेळाकडे अधिक लक्ष द्यावे व नियमितपणे क्रीडा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजितभाऊ कोवासे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, पर्यावरण विभाग अध्यक्ष राजेश ठाकूर, प्रभाग संघ अध्यक्ष सौ. सागरताई कुमरे, वालसरा येथील पोलीस पाटील भगीरथजी भांडेकर, शासकीय कंत्राटदार गंगाधरजी कुकुडकर, डी. वाय. एस. पी. लांबेवार साहेब, उमेशभाऊ कुमरे, सुरपाम साहेब, गौरव येणप्रेडडीवार, विजयभाऊ लाड, निलभाऊ ठाकूर,अनुप कोहळे, प्रफुल बारसागडे, विनायक बारसागडे, वसंत कोहळे, मारोती कोपूलवार, आशिष घेर यांच्यासह मान्यवर, युवक, मंडळाचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.







