आंदोलन स्थळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाची भेट; आंदोलनाला जाहीर पाठिंबा

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.6 जानेवारी) :– सुरजगड परिसरातील वनजमिनीवरील कथित अतिक्रमण, बेनकायदेशीर रस्ते व प्लांट उभारणीविरोधात आदर्श समाज विकास सेवा संस्था, पोर्ला यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास आज राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनाचे नेतृत्व

योगाजी पांडुरंग कुडवे — अध्यक्ष, आदर्श समाज विकास सेवा संस्था

यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

या भेटीदरम्यान राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांची माहिती जाणून घेतली व स्थानिक आदिवासी व वनहक्क संरक्षणासाठी संघटनेतर्फे साथ राहील असे आश्वासन दिले.

आंदोलनकर्त्यांनी सुरजगड लॉन्ज मेटल कंपनीकडून वनक्षेत्रात होत असलेल्या कथित अतिक्रमणाविरोधात तत्काळ कारवाई, बेनकायदेशीर कामे थांबविणे, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या मागण्या केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.