रेती तस्करांचा API वर प्राणघातक हल्ला; बचावासाठी केला गोळीबार

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.18 डिसेंबर) :- 

जिल्ह्यात रेती तस्करांची दहशत वाढतच असून गुरुवारी महागाव तालुक्यांतील वाकोडी (वाडी) मोरथ जवळ रेती तस्करांनी थेट पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर पाच रेती तस्करांनी हल्ला केला. या हाणामारीत महागाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे हे जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अंबुरे यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केला. 

   गुरुवारी तालुक्यांतील मोरथ- वाकोडी (वाडी) या ठिकाणी रेती तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकांवर माफियांनी हल्ला चढवल्याने एपीआय सुनील अंभोरे यांनी स्वतःच्या आरक्षणासाठी दोन राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. या मध्ये गुलाब खाजा शेख हा एक आरोपी जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने नंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. SRPF, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी भेट देवून पाहणी केली.

यापूर्वी तालुक्यांत काळी ( टेंभी) परिसरात रेतीमाफी द्वारे तलाठी गणेश मोळके यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. प्रशासनाच्या हप्तेखोर प्रवृत्तीमुळे निर्ढावलेले रेतीमाफीये लाखोंची कमाई करीत असून या काळया पैशातून शस्त्र खरेदी पर्यंत ही संघटित गुन्हेगारी पोहोचली आहे. वाकोडी (वाडी) येथे रेतीमाफीयांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक हल्ला चढविला. प्रशासनाची हप्तेखोरी,मस्तवाल झालेले रेतीतस्कर आणि खालावलेली कायदा व सुव्यवस्था हे आजच्या घटनेचे भीषण वास्तव आहे.