✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.7 डिसेंबर) :-
प्रियदर्शनी शिक्षण संस्था द्वारा संचालित वनमालाताई राठोड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच टी.जी.देशमुख प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आमणी (बु.)ता.महागाव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धा,शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवेदिता भरकाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डिंपल जगताप यांची या वेळी उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक के.एन.कावडे, प्रा. जे.डी.वानखेडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या स्वागत गीताने झाली. विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजाने सभागृह भारावून गेले. स्नेहा वाघमारे व प्रतीक्षा तायकोटे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी गुडुप या विद्यार्थिनींनी सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे व गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रम अत्यंत प्रभावी बनवला.
प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन गटांमध्ये भाषण व गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.प्रथम क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.कार्यक्रमात मुख्याध्यापक के.एन.कावडे व नामदेव सूर्यवंशी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर भावपूर्ण गीत सादर केले. स्पर्धेचे परीक्षण मंजुषा पद्मावार व पतंगे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन बारावी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट रीतीने केले.पी.टी.विनकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचे प्राचार्य जे.डी.वानखेडे यांनी कौतुक करीत प्रोत्साहित केले.या आयोजनात अनिकेत राऊत,स्नेहा वाघमारे, अभिषेक खोसे,बबलू राठोड,मोहिनी सुरोशे,अंजली जाधव, रोशनी माकोडे,कांचन राठोड,प्राची शिंदे, आश्लेषा कांबळे यांचे योगदान राहिले.
कार्यक्रमा साठी पी.टी. विनकरे,शरयू गवळी,संभू सोनटक्के यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे दृश्य चित्रीकरण अमोल पवार व प्रकाश येळणे यांनी केले.निवेदिता मॅडम यांनी “विद्यार्थी जीवनात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज” या विषयावर प्रभावी भाषण केले,तर प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्ष आचरणात कसे उतरवावेत यावर प्रेरणादायक मार्गदर्शन केले. प्रसंगी आभार पूजा वरुडे हीने मानले. कार्यक्रमाची सांगता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून झाली.







