✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.3 डिसेंबर) :-
तालुक्यातील बोरगावं (देश ) येथे हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन,यांच्या वतीने आणि कृषक सेतू फॉउंडेशन वरोरा व वेद संस्था शेगाव व ग्रामपंचायत बोरगावं (देश )यांच्या सहकार्यातून जेष्ठ नागरिका करिता आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उदघाट्न प्रकाश जिवतोडे, माजी सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर खांडेकर ,प्रवीण सूर,ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी, हेल्पेज इंडिया सामाजिक टीम संरक्षण अधिकारी राशेदा शेख , डॉअश्विनी मगरे इत्यादी उपस्थित होते.ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी यांनी ओज संस्थेचे सामाजिक कार्याबाबत व आरोग्याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. राशेदा शेख यांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायची या बाबत जेष्ठ नागरिकांसोबत हितगुज साधले व आरोग्य बाबत समस्या जाणून घेतल्या.
हेल्पेज इंडिया एम.एच. यु.व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 93 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.
या शिबिरात बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर अश्विनी मगरे व राशेदा शेख, फार्मासिस्ट वैभव देठे व संदीप काळे मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण सूर, आशा वर्कर, उमेद साधनव्यक्ती इत्यादीनी सहकार्य केले.







