🔸कापूस वेचणी दरम्यान दोन सख्या जावांची निर्गुण हत्या
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.22 नोव्हेंबर) :-
माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दोन सख्या जावांचे दागिने लुटून गळा दाबून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली होती. या घटनेची माहिती माहूर पोलीस स्टेशनला कळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी सदर घटना जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून घटना स्थळी विविध पथके बोलावून पंचनामे, पुरावे,जमा केली होती.
या खून प्रकरणातील आरोपी सुरेश दत्ता लिंगनवार वय 38 वर्षे रा. सदोबा सावळी ता. आर्णी जी. यवतमाळ व दुसरा गजानन गंगाराम येरजवार वय 41 वर्षे या दोघांनी पाचोंदा येथील दोन्ही सख्या जावांचे दागिने लुटून त्यांची हत्या केल्याची कबूली दिली. सुरेश लिंगरवार हा गंगाजीनगर सेलू (करंजी) ता.माहूर येथे नातेवाईकांच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला असल्याची माहिती गोपनीय माहिती कळताच त्या ठिकाणी जाऊन नांदेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरा आरोपी गजानन येरजवार याला सुद्धा गंगाजी नगर सेलू येथून ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील एक मोटरसायकल दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरोधात गु.र. नंबर 191/2025 कलम 103(1),311, 309(6), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे करीत आहेत.
या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वागळे, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले, पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड, मोहन हाके, ज्ञानोबा कवठेकर, देविदास चव्हाण, मोतीराम पवार, सिद्धार्थ सोनसळे, रितेश कुलथे,धम्मा जाधव, मारुती मुंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक कोठवणे या पथकाने आरोपीला घटनेच्या बारा तासाच्या आत पकडण्यात यशस्वी कामगिरी केली असल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.







