✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.20 नोव्हेंबर) :-
2016 च्या मागील पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीत अंजुमलाला एमआयएम पक्षामध्ये नव्हते. एमआयएम पक्षामध्ये त्यावेळी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्यात आला होता. त्या उमेदवारास आठ लाख रुपयाचे लक्ष्मी दर्शन देत सत्ताधारी पार्टीने पळवून नेले होते. अंजुमखान यांनी पाच वर्षांपूर्वी एमआयएम मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पक्ष संघटन वाढीसाठी प्रचंड परिश्रम घेत पक्षाला बळकटी आणली. यावेळी पुसद नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत इतर तीन आणि मुस्लिम समाजाचे सहा असे नऊ उमेदवार एमआयएम कडून निवडणूक रिंगणात उभे आहेत.
अंजुम खान यांनी अनेक कार्यकर्त्यांना एमआयएम मध्ये समाविष्ट करून घेतले. पक्ष वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्या मध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. पक्ष प्रवेशा करिता अंजुमखान यांनी नगर परिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती जॉकी अन्वर आणि सय्यद जहीर (राष्ट्रवादी) या नगरसेवकांच्या प्रवेशासाठी पक्षश्रेष्ठीकडे रेटा लावून धरला होता. एमआयएम पक्ष संघटन वाढीसाठी कार्यकर्त्यांना एकत्रित केले. सैय्यद जहीर यांनाही पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न चालवलेत.
मागील वेळी त्यांच्या मातोश्री नगरसेविका होत्या. परंतु पुढे कालांतराने मतभेद वाढल्याने जहीर खान यांनी एमआयएमला सोडचिट्टी देत आपला स्वपक्ष असलेल्या राष्ट्रवादी मध्ये घरोबा केला. पुसद नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून जॉकी अन्वर यांची उमेदवारी जाहीर केली होती,परंतु जॅकीर अन्वर यांनाही निवडणुकीच्या एका दिवसापूर्वी विश्वासघात करीत धोका दिला.अंजुमखान यांनी हार न मानता एका रात्रीतून जॉकी अन्वर ऐवजी सैय्यद सिद्धीकोदिन सैय्यद सैफुद्दीन यांना एमआयएम पक्षा कडून नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी मिळवत निवडणूक रिंगणात उतरविले. पहिल्यांदाच एमआयएमच्या इतिहासात पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत इतर तीन आणि मुस्लिम समाजाचे सहा उमेदवार असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचे धाडस एमआयएम जिल्हाध्यक्ष अंजुमखान (लाला) यांनी केले. एमआयएमला पुसद शहरात या वेळी प्रचंड जनाधार मिळत आहे.







