पुसद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.11 नोव्हेंबर) :- 

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये महाविकास आघाडी शिवसेना (उ.बा.ठा.गट), राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) आणि काँग्रेस पक्षानी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा तीन दिवसांपूर्वी रविवारी पुसद येथील दरबार हॉटेल येथे आयोजीत पत्रकार परिषदेत घेण्यात आला. 

  पत्रकार परिषदेत बोलतांना आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, पुसदच्या विकासासाठी आणि ‘लोकशाही व विकासाच्या मूल्यांसाठी’ एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नगरपरिषदेतील सत्तांतरा साठी आणि भाजपच्या अपयशाला मतदारांनी दिलेले उत्तर बळकट करण्या साठी आम्ही एकत्र आलो आहोत.

या वेळी महाविकास आघाडीचे माजी विधान परिषद सदस्य डॉ.वजाहत मिर्झा,शरद पवार पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक प्रमुख शरद मैंद, दिलीप एडतकर,डॉ. मोहंमद नदीम,अनिल शिंदे, डॉ.अकील मेमन, रवी पांडे सय्यद ईस्ताक,अँड. वीरेंद्र राजे, विजयराव चव्हाण,अनुकूल चव्हाण,परमेश्वर जयस्वाल तसेच स्थानिक पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आघाडीच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली. या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. महायुती अजूनही धूसफूस पहायला मिळत असून महायुती पुसद नगरपरिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार की…? हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे कळते.