माता मंदीर देवस्थान राजुरा येथे कार्तिक पौर्णिमा महोत्सवाला सुरुवात

🔸स्वच्छता श्रमदान, घटस्थापना, महिला -पुरुष व बालगोपालांच्या भजनासह कीर्तन गोंधळ, भजन संधेचे भव्य आयोजन

🔸६ नोव्हेंबर ला महाप्रसादाचे आयोजन

✒️सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि.5 नोव्हेंबर) :- 

             नवसाला पावणारी, पुर्वी घनदाट वनात असणारी माता म्हणून प्रसिद्ध असणारी माता. घरातील विवाह मंगल प्रसंगी तसेच हिंदू धार्मिक सण समारंभांना विशेष पूजाअर्चना या माता मंदीर देवस्थानात मोठ्या भक्तीभावाने करण्यात येते. दिनांक ७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत पहाटे ५:३० वाजता नित्यनेमाने महिलांची काकड आरती सुरू असते. माता मंदीर देवस्थान राजुरा जवाहर नगर महिला माता सेवा समिती, माता मंदीर समिती, युवक समितीच्या वतीने दरवर्षी कार्तिक पौर्णिमा महोत्सव साजरा करीत असते.

बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर ला महोत्सवाची सुरुवात झाली असून. सकाळी स्वच्छता अभियान, श्रमदान, व परशुराम साळवे महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता पासून ज्येष्ठ भजन मंडळ, फुलाजी महाराज भजन मंडळ, सरस्वती भजन मंडळ, गुरुदेव बाल गणेश मंडळ रामपुर, सायंकाळी ७ वाजता राजीव कानडे वर्धा यांचे गोंधळ कार्यक्रम. गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर सकाळी १० वाजता फुलाजीबाबा भजन मंडळ, दुपारी १२ वाजता कीर्तन, हभप विलास महाराज कुळसंगे, कवठा, जिल्हा आसीफाबाद, दुपारी ३ वाजता आनंदी महिला भजन, सायंकाळी ५ वाजता परमहंस आडकोजी महाराज भजन मंडळ, ७ वाजता स्वरांकित भजन संध्या म्युझिकल ग्रुप चंद्रपूर व रात्री ७:३० वाजता पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.