गुंजाळा येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर संपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा(दि.3 ऑक्टोबर) :- 

       तालुक्यातील गुंजाळा येथे हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन, ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा व कृषक सेतू फॉउंडेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 या शिबिराचे उद्घाटन मधुकर चौधरी सरपंच गुंजाळा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गुंजाळा येथील उपसरपंच वंदना अनिल खाटे, विनायक चौधरी, संध्या नन्नावरे,अंकुश धोटे, सुधाकर श्रीरामे,ओज संस्थेचे समन्वयक रमेश चौधरी, हेल्पेज इंडिया सामाजिक टीम संरक्षण अधिकारी राशेदा शेख , डॉ. राहिल शेख, इत्यादी उपस्थित होते.राशेदा शेख यांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायची या बाबत वृद्धा सोबत हितगुज साधले व आरोग्य बाबत समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चौधरी यांनी केले.यामध्ये आरोग्य बाबत शासकीय योजना बाबत माहिती दिली. वृद्धकाळात कोणती काळजी घ्यावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 89 वृद्ध व्यक्तीची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. 

या शिबिरात बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर राहिल शेख व राशेदा शेख, फार्मासिस्ट वैभव देठे व संदीप काळे मोलाचे योगदान दिले. 

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील महीला बचत गटांनी, आशा वर्कर,आरोग्य उपकेंद्र टीम, ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादीनी सहकार्य केले.