🔸जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांची तक्रार
🔹एसडी कंट्रक्शनच्या अनेक तक्रारी होऊनही कारवाई नाही
✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.3 नोव्हेंबर) :-
माहूर तालुक्यात रस्त्याची निकृष्ट कामे करण्यात फेमस असलेल्या एस डी कंट्रक्शन कंपनी कडून लांजी बायपास ते टाकळी रस्त्यावर आमदार भीमराव केराम यांच्या निधीतून दोन पूल आणि त्यामधील रस्त्याच्या कामात अनियमितता होत असल्याने जिल्हा परिषद नांदेड चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी तक्रार केल्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग माहूर च्या वतीने दि १ रोजी सदरील रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टी माती मिश्रित मुरूम चे सॅम्पल घेऊन जप्त करण्यातआल्याने खळबळ उडाली आहे .
एसडी कंट्रक्शन कंपनीच्या वतीने अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील दोन्ही पुलाचे काम करत असताना वेळेत काम पूर्ण केले नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला तर अनेकांचे अपघात झाले परंतु या कंपनीस काही घेणेदेणे नाही या अविर्भावात काम सुरू होते सदरील कंपनीचे स्टोन क्रेशर सील करण्यात आले तरीही येथूनच गिट्टी आणि माती मिश्रित मुरूम कालवा कालव करून या रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने रस्ता अनेक ठिकाणी दबलाअसून डांबरीकरण झाल्यानंतर काय हाल होतील याची कल्पनाच न केलेली बरी कंपनीच्या वतीने नियमांना तीलांजली देत रस्ता बनविण्यात या येत असल्याने या रस्त्यावरून जात असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांना सदरील गैरप्रकार आढळून आल्याने त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग माहूरचे उपविभागीय अभियंता डी के भिसे यांच्याशी संपर्क साधून सदरील गिट्टी माती मिश्रित मुरुमाचे सॅम्पल घेण्याचे सांगितल्याने शाखा आभियंता आकाश राठोड यांनी तात्काळ जाय मोक्यावर येऊन मान्यवरा समक्ष सदरील वस्तूंचे सॅम्पल जप्त केले.
सदरील कंपनीचे मालवाडा शिवारात स्टोन क्रेशर असून येथून नियमबाह्य मुरूम उत्खनन करून या रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या याआधी या कंपनीने येथून मुरूम दगड भरपूर प्रमाणात काढून नेल्याने त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत तर त्यांनी केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या तक्रारीचा ढग खूप मोठा असल्याने मोठा पदाधिकारी यांना वाचवीत असल्याचे जाहीर होत असून महसूल विभागाने झालेल्या ईटीएस मोजणीचा अहवाल प्रकाशित करून मुरूम दगड उत्खनन प्रकरणी तात्काळ दंडीत करावे अशी मागणी होत असताना या रस्त्याचे निकृष्ट काम आमदार भीमराव केराम यांच्यासाठी बदनामी कारक ठरत असल्याने सदरील कंपनीवर तात्काळ कारवाई करून रस्ता नियमानुसार बनवून घ्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी केली आहे यावेळी आनंद चुंगडे दिलेरसिंह चुंगडे लक्ष्मण घुले यांचे सह मान्यवर उपस्थित होते.







