बलिप्रतिपदेच्या दिवशी अखिल भारतीय किसान सभा प्रहार जनशक्ती पक्ष, किसान ब्रिगेड व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्त्यावर सोयाबीन ओतुन आंदोलन

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.25 ऑक्टोबर) :- 

आज दिनांक २२/१०/२०२५ रोजी अखिल भारतीय किसान सभा, प्रहार जनशक्ती पक्ष, किसान ब्रिगेड व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माहुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंद्र सरकारने सोयाबीनला ५३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.प्रत्यक्षात मात्र हंगामाच्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन ३७०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे विकावे लागत आहे.केंद्र सरकारने जाहीर केलेला हमी भाव शेतकऱ्यांना यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीन सरकारी खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केल्या प्रमाणे ५३२८ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी आज बळी प्रतिपदेच्या दिवशी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विजय गाभणे किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शंकर सिडाम तालुका सचिव कॉम्रेड किशोर पवार कॉम्रेड बाबा डाखोरे कॉम्रेड संजय मानकर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमजद खान पठाण युवा नेते पिंटु पाटील वायफणीकर शिवचरण राठोड सुभाष दवणे बोबडे भाऊ किसान ब्रिगेड चे नेते अविनाश पाटील टनमने वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड यांनी केले तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी किसान सभेचे तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड राजु भाऊ पिसरवाड गांगजी मेश्राम दिगांबर आगिरकर विजय पिसरवाड श्रीराम चव्हाण सतिष निलेवाड संतोष शेंडे दत्ता महाराज निलेवाड अरविंद पवार प्रमोद राठोड बंडु कांबळे दिगांबर कांबळे सिध्दार्थ चवरे मुस्सा दुंगे किसन बरगे रामदास डुकरे सह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.