🔸माहुरात महास्वच्छता अभियानाला सुरुवात
✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.14 ऑक्टोबर) :-
पावसाळ्यात अतिवृष्टी सह मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील सर्वच नाल्या तुंबल्या होत्या तर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीस अडथळा होत होता त्यामुळे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे यासह कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड यांनी शहरातील सर्व रस्ते व नाल्यांची पाहणी करून तत्काळ खड्डे बुजवणे यासह नाल्या स्वच्छ करणे तसेच रस्त्यावरील छोट्या पुलाखाली दगड माती कचरा जाऊन बसलेला असल्याने ते स्वच्छ करणे यासह हागणदारी मुक्ती ला प्रथम प्रधान्य देऊन शहरात महास्वच्छता अभियान सुरू केल्याने नगरपंचायतचे कौतुक होत आहे.
पावसाळा संपलेला असल्याने डासांचा प्रदुर्भाव सर्दी खोकलां चोहीकडे सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायत कडून मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड स्वच्छता दूत गणेश जाधव यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती त्या अनुषंगाने शहरात टप्प्याटप्प्याने महास्वच्छता अभियान राबवून सर्व नाल्या कोरड्या करत कचरा काढून डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपंचायतने कंबर असलेली दिसून येत आहे.
नागरिकांनी शहरात रोगराई पसरू नये यासाठी कचरा रस्त्यावर फेकू नये ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा ठेवत घंटागाडीच्या वेळेनुसार कचरा गाडीत टाकून शहर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी केले आहे.







