राहुर येथील अपात्र सरपंच्याला राजकीय दबाव तंत्रातून बीडीओंनी प्रभार दिल्याचा उपोषणकर्त्याचा आरोप
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.12 ऑक्टोबर) :-
राहुर येथील सरपंचाला आर्थिक व्यवहार करून रात्री बारा वाजताचे दरम्यान 6 ऑक्टोबर 2025 रोजी गटविकास अधिकारी महागाव यांनी नियमबाह्य आदेश देऊन अपात्र सरपंच्याला ग्रामपंचायतचा पदभार देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यास सुचित केले. गट विकास अधिकाऱ्यां द्वारे वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना झाल्याने शिवाजी रामचंद्र गोपणवाड आणि दामोदर चाफाजी जाधव यांनी गट विकास अधिकारी यांच्यावर आरोप करीत काल शनिवार पासून महागाव पंचायत समितीच्या प्रांगणात ग्रामस्थासह आमरण उपोषण प्रारंभ केले.
या बाबत सविस्तर वृत्त, राहुर गावच्या सरपंच्या राजनंदनी शिवाजी काचेवार यांनी राहुर ग्रामपंचायतीच्या अनेक कारभारामध्ये अनियमितता व पदाचा दुरुपयोग केल्याचे पंचायत समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 4 आगस्ट रोजी त्यांना अपात्र घोषित केले. सेवादास महाराज मंदिरातील साफसफाई, सार्वजनिक विहिरीच्या साफसफाई मजुरीच्या धनादेशावर सचिवांनी स्वाक्षरी केली असतांना सरपंच यांनी स्वाक्षरी केली नव्हती. सरपंचाच्यानी शिफारस करून आपल्या पतीचे पक्के घर असतांना दुरूनच कच्चे घर दाखवून पदाचा दुरुपयोग करून घरकुलाचा लाभ घेतल्याचा जिल्हाधिकारी यांनी ठपका ठेवला आहे. अग्रीम म्हणून घरकुलाचे 15 हजार रुपये उचल केलेली रक्कम वसुली पात्र घोषित केले होते.तरीही अद्याप महागाव गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी ती रक्कम वसूल न करता संबंधीतावर फौजदारी कार्यवाही करणे अपेक्षित असतांना राजकीय दबावामुळे आयुक्तांच्या आदेशाचा गैरअर्थ काढून आर्थिक घेवान करून अपात्र सरपंचाला पदभार देण्याचे पत्र दिले, असा दिलेल्या तक्रारीतून गट विकास अधिकारी यांच्यावर आरोप केला आहे. वास्तविक पाहता सरपंच्यावर वरील अनियमितता व ग्रामविकास अधिकारी यांच्या अहवाला वरून सर्व आरोप सिद्ध झाल्ये असतांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 4 ऑगस्ट रोजी अपात्रतेचा आदेश पारित केला. या आदेशाच्या विरोधात अपात्र सरपंच्यानी आयुक्ताकडे अपील केले होते. या अपीलावर 4 ऑगस्ट 2025 रोजी आदेशाला स्थगिती मिळावी असा अर्ज केला असता आयुक्तांनी सर्व घटनाक्रम व दोन्ही बाजू एकूण 13 ऑगस्ट 2025 रोजी अपात्र सरपंच्याला स्थगीती न देता जिल्हाधिकारी यांचा आदेश ‘जैसे थे’ ठेवला आहे.
परंतु दुसऱ्या तारखेवर 3 सप्टेंबर 2025 रोजी अपात्र सरपंच्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अंतिम स्थगिती दिली होती. परंतु पुढील तारखेला 24 सप्टेंबर 2025 रोजी ही अंतिम स्थगिती उठवून पूर्ववत 13 ऑगस्ट 2025 रोजीचे ‘जैसेथे’ चे आदेश कायम ठेवले आहे,एवढे सुस्पष्ट आदेश असतांनाही महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम यांनी शेवटचे 24 सप्टेंबर 2025 चे आदेश विचारात न घेता मुद्दाम राजकीय दबावात 3 सप्टेंबर 2025 चे रद्द झालेल्या अंतरिम आदेशाचा आधार घेऊन भ्रष्ट सरपंच्याला आर्थिक व्यवहार करून रात्री बारा वाजताच्या दरम्यान 6 ऑक्टोबर 2025 रोजी नियमबाह्य पद्धतीने आदेश देऊन अपात्र सरपंच्याला राहुर ग्रामपंचायतचा पदभार दिला असल्याचे उपोषणकर्त्यानी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. गटविकास गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम यांनी 6 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास अधिकारी राहुर यांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करून 4 ऑगस्ट 2025 रोजीचे ‘जैसे थे’ ठेवावे ही मागणी घेऊन शिवाजी गोपनवाड,माजी सरपंच दामोदर जाधव, ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव, टिपू शेख यांनी काल शनिवारी 11 ऑक्टोबरच्या दुपारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला.
(अप्पर आयुक्तांनी सरपंच पद ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाची सुनावणी 29 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. तो पर्यंत उपोषणकर्त्यांनी आदेशाची वाट पाहणे आवश्यक होते. उपोषणाला बसण्याची कसल्याही प्रकारची प्रशासनाकडून पूर्व परवानगी न घेता पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले. सदर उपोषण नियमबाह्य असून या बाबत रीतसर महागाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली.)
दत्तात्रेय कदम, गटविकास अधिकारी,प.स. महागाव







