दारूबंदीसाठी आमडी येथील ग्रामस्थांचा एल्गार

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 ऑक्टोबर) :- 

      चिमूर तालुक्यातील आमडी येथील लोकसंख्या जवळपास १५९८ महिला पुरुष असून, येथे आज महिला पुरुषांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली असून, यात पुरुष ११८ महिला १४५ असे एकूण २६३ गावकरी ग्रामसभेत उपस्थित होते. सदर ग्रामसभेत आज एकमताने दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे. 

         चिमूर तालुक्यातील अनेक गावे अवैध धंद्याने फोफावले असून, आमडी (बेगडे) येथे सुद्धा अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. या अवैध धंद्याने येथील महिला व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वनविभागाच्या अगदी गेट जवळील शेताजवळच अवैध दारू विक्री केली जाते. तसेच हनुमान मंदिराला लागूनच सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते. हे गावात अवैध धंदे दारू विक्री करणारे अनेकदा शब्दीक वाद करीत असतात. अश्लील शब्दांचा भडिमार होत असतो. त्यामुळं या त्रासाला कंटाळून गावातील महिला पुरुष व ग्रामस्थ एकवटले असून, गावात दारूबंदी होऊन गाव दारूमुक्त व्हावा हा समस्त गावकऱ्यांनी संकल्प घेतला असून, दारूबंदी विरुद्ध आमडी येथील गावकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. 

        याबाबतचा दारूबंदी विरोधात झालेला ठराव चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ पाठविण्यात येणार असल्याचे मत दारूबंदी समितीचे सचिव अरुण गोरवे यांनी सांगितले आहे.

         सदर विशेष ग्रामसभेत गटग्रामपंचायत आमडी बेगडे येथील सरपंच कल्पना बंडुजी धोटे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश राठोड, सदस्य अविनाश गाठे, विठ्ठल रणदिवे, शितल गोरवे, प्रतिक्षा ढोक, समिर पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रफुल डरे, पोलीस पाटील मुकेश गिरी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बंडूजी भलमे, सामाजिक कार्यकर्ते अरुण बगने, रामभाऊ कडूकर आदी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील हजारो संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. 

अशी आहे तंटामुक्त समिती 

 शंकर केशव दांडेकर अध्यक्ष, 

अरुण कवडू बगणे सचिव, कल्पना बंडू धोटे सदस्या, नंदकिशोर हिवरकर, प्रफुल डरे, मुकेश गिरी, बंडूजी भलमे, भारत नन्नावरे, अरुण चंदनखेडे, विजय शेंडे, नितेश डुकसे, ब्रम्हानंद गोरवे आदींचा समावेश आहे.

      गावातील दारूबंदीसाठी प्रशासनाने जर आमडी बेगडे येथील गावकऱ्यांना सहकार्य केले नाही तर समस्त गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.

      अरुण गोरवे, सचिव दारूबंदी समिती आमडी