🔸शहरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या दुचाकी रॅलीचा रामपुर येथे समारोप
✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि.8ऑक्टोबर) :-
१ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वनविभाग वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत जागतीक वन्यजीव सप्ताह राबविण्यात आला. यावेळी विविध जनजागृती उपक्रम, मध्य चांदा वनविभागाच्या विनोद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वनपरिक्षेत्र राजुरा येथे मंगेश गिरडकर, उपविभागीय वन अधिकारी राजुरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दुचाकी रॅली ची सुरुवात केली. कार्यक्रमात वन अधिकारी , वन कर्मचारी , रोजंदारी मजूर व पिआरटी टीम सर्व मिळून वन्यजीव सप्ताहा च्या अनुषंगाने दुचाकी (बाईक) रॅली च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ही रॅली वनपरिक्षेत्र कार्यालय राजुरा ते गांधी चौक , आसिफाबाद रोड , गडचांदुर रोड ते रामपूर गाव ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूर येथे वन्यजीव सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उपस्थित एम. बी. वाघमारे ,मुख्याध्यापक जि.प.उ.प्रा. शाळा रामपूर , वर्षा राठोड, शिक्षिका जि.प.उ.प्रा. शाळा रामपूर, रमेश झाडे ग्रा.प.माजी सदस्य रामपूर , एम.एन.निबुद्धे क्षेत्र सहाय्यक विहिरगाव , पी.आर. मत्ते, क्षेत्र साहाय्यक टेंबुरवाही, एस.जी.गरमडे , क्षेत्र साहाय्यक राजुरा,सोनडवले ,वनपाल रोपवाटिका सुमठाना, मोंढे , वनपाल तेंदु , एस.एम.ढवळे वनपाल, पी.ए.मंदुलवार ,नियत वनरक्षक राजुरा रामपुर (अति) , एम.ए.चापले नियत वनरक्षक चुनाळा, एस.आय.तोडासे नियत वनरक्षक सुमठाना, पी. डब्ल्यू. देशमुख नियत वनरक्षक खांबाडा, बी.आर.दांडेकर नियत वनरक्षक टेंबुरवाही, बी.एम.ताकसांडे नियत वनरक्षक सीर्सी, टी.ओ.कामले नियत वनरक्षक मुर्ती, व्ही.ए.मांढरे वनरक्षक संरक्षण पथकं, ए.ताजणे वनरक्षक संरक्षण पथकं, के.आर.सिंग नियत वनरक्षक तुलाना, ए.बी.नेवारे नियत वनरक्षक जोगापुर, पी.एस. टेभेंकर नियत वनरक्षक नलफडी, जी.एम. चव्हाण नियत वनरक्षक चनाखा, एस.बी. ताकसांडे वनरक्षक संरक्षण पथकं, ए.एस. मुलकलवार वनरक्षक संरक्षण पथकं,व रोजंदारी मजुर तसेच पीआरटी टीम सदर कार्यक्रमात हजर होते.







