पंचशील विद्यालय लखमापूरच्या कब्बडी संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.3 ऑक्टोबर) :- 

लखमापूर, ता. नांदेड — दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 दरम्यान पंचशील विद्यालय, लखमापूर येथे तालुका स्तरीय सर्व वयोगटाची कब्बडी स्पर्धा उत्साहात पार पडली.

श्री. विकास रघुनाथ टेकाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील विद्यालयाच्या मुलींच्या 14 वर्षाखालील संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच मुलांच्या 14 वर्षाखालील संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशानिमित्त 8 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाश दादा नारायण गायकवाड, मुख्याध्यापक श्री. अमोल प्रकाश गायकवाड सर, श्री. रवींद्र गायकवाड सर तसेच इतर शिक्षक व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांनी संघाला शुभेच्छा देत पुढील स्पर्धेत यशस्वी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.