माहूर बसस्थानकावर सचोटीची झलक : हरवलेला मोबाईल मालकास परत

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.2 ऑक्टोबर) : – माहूर बसस्थानकावर ड्युटीवर असलेले होमगार्ड शेख असलम शेख युसुफ (स.नं. 794) यांना हालचाली दरम्यान ओप्पो कंपनीचा मोबाईल सापडला. त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे न ठेवता तत्काळ पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली मालकापर्यंत पोहोचवला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोबाईल परमेश्वर पंडित या नगर येथील भाविकास परत करण्यात आला असून, या प्रामाणिकपणामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी कौतुक व्यक्त केले आहे.होमगार्ड शेख यांच्या सचोटीमुळे पोलिस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.