माहूर तालुक्यात पावसाने ३० वर्षातील उच्चांक मोडला काढणीला आलेले सोयाबीन वाहून गेले. शेतात पाणी पाणी 

✒️शेख रफीक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.28 सप्टेंबर) :- 

माहूरगडावर नवरात्र उत्सव आनंदात साजरा होत असताना चौथ्या माळे पासून पावसाने उघकीस न दिसल्याने गडावर येणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झालेला आहे तसेच आधीच पावसाने ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना पुन्हा पाऊस बेलगाम पडत असल्याने शेत शिवार पूर्णपणे पाणीदार झाले आहेत गेल्या ३० वर्षापासून ८०० मिलिमीटर च्या हातात पडणाऱ्या पावसाने १ हजार २३५ .५ मिलिमीटर पर्यंत मजल मारल्याने एकेरी २ क्विंटल पर्यंत हाती येणारे सोयाबीन चे पूर्णपणे नासले असून संपूर्ण शिवारात पाणीच पाणी तर व्यापारावर ही आवळा आल्याने रोजगाराची संधी असलेल्या कुठलाही उद्योग माहूर तालुक्यात नसल्याने मजुरावर उपासमारीची पाळी आली आहे .

 तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड हे नवरात्रोत्सव आणि पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून शासनाकडे योग्य तो अहवाल पाठवत असले तरी ही कोरडवाहू असलेल्या तालुक्यात अल्पभूधारक शेतकरी हात गडावर मिळेल तो माल एकूण पोट भरणारे किरकोळ व्यवसायिक मजुरावर आलेली दुष्काळी परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावून जात असले तरीही ते काहीच करू शकत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ कर्जमाफी सह शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान स्वरूप रक्कम तात्काळ टाकावी अशी मागणी शेतकरी शेतमजूर वर्ग आणि सर्व पक्षीय नेत्याकडून होत आहेत .