✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .27 सप्टेंबर) :- दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक, चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या न्याय मागण्याकरिता प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, चंद्रपूर यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले.
या उपोषणाला केंद्रीय सरकार्यवाह श्री. संजय बोधे सर, जिल्हा अध्यक्ष रवींद्रजी मोटघरे सर, कार्याध्यक्ष प्रीतमजी सोनारकर सर,, अरुण गायकवाड चिमूर तालुका अध्यक्ष,मनोज वनकर सर वरोरा तालुका सचिव, गुलाबजी बागेसर,वाशिष्ठ पेटकर वरोरा तालुका अध्यक्ष, दिवाकर डबले, नयन देशकर, कृपलानी शेंडे,भट्टलवार, डॉक्टर रंगश्यामजी मोडक, अमर गोले टकर , जालदर लांडे,प्रमोदजी सोरते,, विलासजी रामटेके,प्रांजल रामाजी बेलखुडे, नीता रामाजी बेलखुडे,दिगांबर दुर्योधन उपस्थित होते.आज प्रजासत्ताक कर्मचारी संघ यांच्या सर्व मागण्या माननीय शिक्षणाधिकारी श्री. राजेशजी पातळे यांनी सोडविण्याचे आश्वस्त केल्यानंतर आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.







