✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.23 सप्टेंबर) :-
महायुती सरकारने सत्तेत येण्या पूर्वी दिलेला शब्द अद्याप पाळला नाही. शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करणार असल्याची भूलथाप दिली आहे. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा आज पावेतो शेतकऱ्याचा विश्वासघातच केला आहे. मालाला भाव नाही, बी- बियाणे,खते, कीटकनाशके यांचे दर गगनाला भिडले आहे. या मध्ये आता नैसर्गिक संकट ओढवले,अशा तिहेरी संकटाने महागांव तालुक्यांतील शेतकरी कमालीचा चिंताग्रस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी 23 सप्टेंबर रोजी शिवसेना (उबाठा) गटाच्या वतीने महागाव तहसील प्रशासनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली.
चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. या पावसाळ्यात जून 2025 ते सप्टेंबर 25 या कालावधी मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. तालुक्यांमध्ये सर्वत्र पूरपरिस्थिती,अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून गेल्या.सर्वत्र शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाती आता काहीएक उत्पन्न येणार नाही याची खात्री झाली आहे. या वेळी तालुक्यांत कसल्याही प्रकारे अनेकांचे योग्य असे पंचनामे व नुकसानीची नोंद घेतली गेली नाही. या अतिवृष्टीमुळे महागांव तालुक्यांत सर्वत्र ओला दुष्काळ झाला आहे. शासनाकडून ओलादुष्काळ आदेश होणे जरुरी आहे.
झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झालेली आहे. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे सरकारने तात्काळ अनुदान मंजूर करून बळीराजाला दिलासा द्यावा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी या मागणी साठी शासनाकडे मंगळवारी तहसील प्रशासनाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद भरवाडे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे झुंजार कार्यकर्ते भीमराव भालेराव, विशाल पांडे, रवींद्र भारती, विलास फाळके, शंकर टेटेर, प्रवीण भांगे, मंजुषा वानखेडे, किरण जामकर, मुकेश कदम, विशाल लेंगरे, भीमराव हाके, सुनंदा राऊत, चंचल नांदे, कैलास पाटे, ओम कुसंगवाड, रवी कदम, आशिष गावंडे, सुशील गावंडे, दत्तराव कदम, अनंतराव जोतरकर, दतराव तळणकर,ऋषिकेश बलखंडे, गणेश घोडे, अतुल कदम, नितीन उबाळे, समाधान इंगळे, प्रदीप बीजनुरे, ज्ञानेश्वर पानपट्टे यांच्या सह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
(राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 अखेर पर्यंत प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. शेत पिकांच्या झालेल्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्यासाठी मंगळवार 23 सप्टेंबर रोजी शासन निर्णय झाला आहे. मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार एक हजार तीनशे एकोण चाळीस कोटी,एकोणपनास लक्ष पंचवीस हजार एवढा निधी मंजूर करण्यात आल्याचे संपत सूर्यवंशी सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या आदेशान्वये माहिती प्राप्त झाली.)







