जी.प. उच्च प्राथमिक मराठी शाळा करंजखेड (जुने) शाळा व्यवस्थापन समिती गठीत

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.23 सप्टेंबर) :- 

करंजखेड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात गठीत करण्यात आली. 20 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शाळा व्यवस्थापन समिती निवडी प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.

 या वेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्ष पदी सूर्यकांत रमेश भांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी प्रविण रामदास ठाकरे यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन सदस्य म्हणून संतोष दादाराव ठाकरे, रमेश पंडित भांडवले,नितीन राठोड, संदीप बोरकर,रघुनाथ देवकर, रवी जाधव, लक्ष्मीकांत भांगे,मंगेश ठाकरे, संजय अग्रवाल,राजेंद्र ठाकरे, काशिनाथ राकडे, शिक्षण तज्ञ म्हणून प्रवीण सिताराम ठाकरे यांची निवड करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी रामलाल नानू जाधव, ग्राम पंचायत सदस्य विश्रांती रमेश भांगे,सचिव प्रकाश तुकाराम कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.

या वेळी गावातील पालक निळकंठ राऊत, नथू भांगे, बंडू ठाकरे, नारायण देवकर, यशवंत भांगे, रावते, राजाराम कदम यांचे सह जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा करंजखेड मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, पदवीधर शिक्षक गजानन नांदेडकर, पदवीधर शिक्षक रामलाल जाधव,पदवीधर शिक्षक निळकंठ गुड्डा ,सहाय्यक शिक्षक अमरदीप पाटील, सहाय्यक शिक्षक लक्ष्मण मुरकुटे,सहाय्यक शिक्षक यादव मुंडे हे शाळा व्यवस्थापन समिती निवडी प्रसंगी उपस्थित होते.