✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि .17 सप्टेंबर) :- भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅंकरने धडक दिल्याने दुचाकी वरील पाठीमागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना दि .16 सप्टेंबर ला सकाळी 6.30 ला अगदी पोलीस स्टेशनं समोर घडली आहे. कोमल गंगाधर कातोरे (वय 33,रा गांधींवॉर्ड वरोरा) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार गंगाधर बापूराव कातोरे वय 42 वर्ष,कोमल गंगाधर कातोरे वय 33 वर्ष व मुलगा रोहन गंगाधर कातोरे हे तिघेही रा. गांधींवार्ड वरोरा येथून आपल्या MH 34 CP 1649 या दुचाकीने भिवापूर साठी काही कामानिमित्य निघाले असून शेगाव जवळ मागून भरधाव येणाऱ्या MH 34 AB 4509 या टँकरने , दुचाकीला जबर धडक दिल्याने पाठीमागे बसलेल्या कोमल गंगाधर कातोरे या महिलेला डोक्याला धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती शेगाव बु पोलिसांना मिळतात त्या टँकरला ताब्यात घेऊन मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक योगेंद्रसिहं यादव साहेब यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक श्री सुमित कांबळे, मदन येरने,हरीश येरमे,छगण जांभुळे, हेमंत पाटिल करीत आहेत..







