✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.14 सप्टेंबर) :- होमगार्डस पथक कार्यालय राजुरा मार्फत दिनांक 12.09.2025 ला *हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र* अभियाना अंतर्गत राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. त्या वेळेस पोलीस निरीक्षक श्री सुमित प्ररतेकी साहेब व श्री पवार साहेब पो. स्टे. राजुरा, तालुका होमगार्ड कार्यालय राजुरा समादेशक अधिकारी श्री शंकर शिट्टलवार साहेब , अंशकालीन लिपिक धनपालसिंग वधावन तसेच होमगार्ड गणेश सातघरे, नितीन सातपुते, सोपान चौधरी, रत्नाकर पायपरे, संदीप झरकर, विनोद माणुसमारे, राकेश चोथले, मुरलीधर वाढई, सुनील रामटेके, व इतर पुरुष आणि महिला होमगार्ड सैनिक हजर होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन *हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र* अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राभाविण्यात आले.







