ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल राजुरा येथे आजी आजोबा दिन कार्यक्रम संपन्न

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा(Rajura प्रतिनिधी)

राजुरा(दि .14 सप्टेंबर) :- 

        “तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहो “या संकल्पनेवर आधारित आजी-आजोबा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १३ सप्टेंबर रोजी ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कूल राजुरा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून बीडीआयपीएस चे केंद्र संचालक अ‍ॅड. मनोज काकडे तसेच देवरावजी निब्रड ,सेवानिवृत मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. 

प्रेम , आपलुकी, जिव्हाळा, अनुभव हाच आपला खरा खजिना आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खास आपल्या आजी आजोबांसाठी नृत्य सादर केलं. या सादरीकरणांमध्ये आजीआजोबांप्रती असलेलं प्रेम, आदर आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमात अनेक आजीआजोबांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. त्यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी, संस्कार, आणि आजच्या पिढीला दिल्या जाणाऱ्या शिकवणींवर प्रकाश टाकला. मुलांनी हाताने तयार केलेली भेटवस्तू आणि पत्रं देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं.तसेच आजीआजोबा आणि नातवंड यांच्यात गट्टी साधणारे बालपणीचे खेळ आयोजित करण्यात आले. यात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला व हास्याचे वातावरण निर्माण केले.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजी-आजोबांसोबतच्या त्यांच्या गोड आठवणी सांगितल्या व पालकांनी आपल्या आई वडिलांन बद्दल आपले प्रेम दर्शवणारे एक हृदयस्पर्शी व्हिडिओ दाखवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेचे सल्लागार सदस्य संदीप मालेकर आणि जयश्री मालेकर , विधाता फाउंडेशनच्या अध्यक्षा शुभांगी धोटे, शाखा प्रमुख सीमा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आलिशा सय्यद, प्रीती सिंग, फिजा शेख, स्नेहल कोंडावार, ममता मॅडम ममता चव्हाण ,मोनिका मॅडम, काजल सिग यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात येतात. याकरिता ममता, अर्चना व सुषमाताई या मदतनीस चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये पालकांनी समाधान व्यक्त करीत शाळेमध्ये विविध उपक्रमातून मुलांना शिक्षण दिल्या जाते याबाबत स्तुती केली.