शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा फक्त वल्गना

🔸वास्तवात मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मारा, शेतकरी कमालीचे हैराण

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव (दि.13 सप्टेंबर) :- राज्याचे मुख्यमंत्री शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात ‘रामकथा’ ऐकण्यासाठी आले खरे. मात्र जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकरीराजा आर्थिक दृष्ट्या उध्वस्त होऊन जगण्याची उमेद गमावून बसला आहे, त्याला धीर मिळणे क्रमप्रप्त आहे. मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आसल्याच्या फक्त वल्गना केल्या गेल्या. दुष्काळाचे सावट पसरले असतांना स्थानिकच्या बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांना न्यायालयात खेचून वसुलीचा तगादा लावला आहे. हैराण झालेल्या शेतकऱ्यांना धीर देत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी सरकारने पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.   

   शासनाकडून मागील दहा वर्षांपासून शेतमालाचे भाव जैसे थे ठेऊन उत्पादन खर्चावर भरमसाठ वाढ होईल याचे पध्दतशीर नियोजन करुन शेतकऱ्यांना आडचणीत आणण्याचे सरकार काम करीत असल्याचे विदारक चित्र आहे. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, कीटकनाशके,मजुरी,काढणी, मळणीचे दर बघीतले तर एकरी शुन्य नफा होत आहे. नैसर्गिक संकटे आता या मध्ये अधिकची भर टाकत असल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला.

शेतकऱ्याकडील थकीत कर्ज वसुलीसाठी न्यायालयात खेचुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सवना सेंट्रल बँकेच्या शाखेने परिसरातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 9 सप्टेंबर रोजी नोटीसी बजावून 13 सप्टेंबर रोजी लोक अदालती मध्ये शेकडो शेतकऱ्यांना बॅकेने न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. सध्या नैसर्गिक संकटाने,अतिवृष्टीमुळे हाती आलेला हंगाम हातुन जाण्याची शेतकऱ्यांना भिती भेडसावत आसतांना ह्या वसुलीसाठी नोटीस बजावल्याने शेतकरी कमालीचे भयभीत होऊन पुर्णतःहा खचले आहेत.

शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याच्या फक्त वल्गना, वास्तवात मात्र ‘तोंड दाबून बुक्यांचा मारा’ अशी म्हणण्याची सध्या शेतकऱ्यांवर पाळी आली आहे. त्यामुळे शासनाने ही वसुली तातडीने रद्द करुन निवडणूकी पुर्वी दीलेल्या आश्वासना प्रमाणे संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांतून मागणी जोर धरत आहे. अन्यथा हतबल झालेल्या शेतकऱ्यावर भंयकर वाईट परिस्थिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.