माहूर येथे ईद-ए-मिलाद उत्साहात

🔸अनंत चतुर्दशीला टाळून दहा तारखेला काढला जुलूस

🔹नगराध्यक्ष यांचे सह ए आय एम आय एम पक्षाकडून पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

✒️शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी) 

 माहूर(दि.11 सप्टेंबर) :- ईद-ए-मिलाद निमित्त माहूर शहरात पारंपरिक जुलूस उत्साहात काढण्यात आला. सकाळी नागीना मस्जिद येथून नात पठणाच्या गजरात सुरू झालेला जुलूस सोनापीर दर्गाह पर्यंत मार्गस्थ झाला. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. धार्मिक, नात पठण व अल्लाह हो अकबर नावाच्या जयघोषाने शहरभर वातावरण दुमदुमून गेले.दी ५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जुलूस होणार होता. धार्मिक श्रद्धांचा आदर राखून मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जपण्यासाठी जुलूस दहा सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरात बंधुभावाचे आणि ऐक्याचे उदाहरण पहावयास मिळाले.

जुलूसाचे स्वागत विविध ठिकाणी नागरिकांनी केले. नगराध्यक्ष फिरोज दोसानी ए आय एम आय एम चे तालुका अध्यक्ष सज्जाद भाई यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पोलीस प्रशासन, नगर परिषद व विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य केले.

धार्मिक सलोखा, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात पार पडलेला हा जुलूस शहरवासीयांसाठी अवीस्मरणीय ठरला. यावेळी ए आय एम आय एम तालुका अध्यक्ष सज्जाद शेख अजीज युवक तालुका अध्यक्ष फैजुल्ला खान नागिना मस्जिदचे सदर ताहेर भाई, गौसिया मस्जिदचे सदर जमीर मल्लनस, इरफान कालुत, नूर भाई, इरशाद राजा, नदीम भाई, सज्जाद, सिराज रजा, नजीर भाई, रफिक गाईड, जावेद भाई (बीएसएनएल), सय्यद मोसिन, शेख सईद, जावेद दोसानी, सैफ दोसानी नवाब शेख अरसलान कलीम खान रिजवान फारुकी शेख अजीज शोएब शेख शहीद लाला शेख अयूब शेख कयूम अरशद खान सोहेल शेख अभिजीत कांबले सलमान खान नजीर शेख इर्शाद शेख वसीम शेख सोनू शेख रियाज शेख इमरान शेख मोबीन शेख शब्बीर शेख समीर खान शोएब शेरा शाहरुख शेख शाहिद लाला मुस्तकीन शेख यांच्यासह हजारो सर्व धर्मीय समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड, सपोनि पालसिंग ब्राह्मण, सपोनि संदीप अन्येबोईनवाड, गजानन चौधरी प्रकाश गेडाम यांचे सह पोलीस होमगार्डनि चोख बंदोबस्त ठेवला.