वानोळ्यात मोरया चा गजर

🔹बाप्पाना भावपूर्ण निरोप

✒️शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी)

माहूर(दि.8 सप्टेंबर) :-‘ गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या , च्या निनादात आणि ढोल ताशाच्या गजरात माहूर तालुक्यातील वानोळा गावात गणरायाला निरोप देण्यात आला.

      दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वक्रतुंड सार्वजनिक गणेश मंडळ वानोळा गावं च्या वतीने विविध उपक्रम राबवून परिसरात जनजागृती केली. विसर्जन मिरवणुकीला दुपारी दोन वाजता सुरुवात करून सायंकाळी पाच च्या आत गणेश विसर्जन शांततेत पार पडले.यावेळी वानोळा गाव येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष गोपाल बनसोडे,उपाध्यक्ष संघर्ष जाधव पाटील, सचिव साईनाथ बनसोडे, सदस्य मिलिंद तोडसाम, आकाश शेळके,धीरज कुडमते, सुखदेव पांडे, अभिषेक, विकास,चव्हाण, भीमराव कुडमेते, सुखदेव पांडे,रोहिदास जाधव,शिवचरण बोथीकर, विवेक बनसोडे, अमन सिडाम, दिनेश मोगरे, कृष्णा आत्राम, अशोक कुडमेते, पत्रकार अँड.नितेश बनसोडे आदी उपस्थित होते.