✒️ सौ.सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा (दि .2 सप्टेंबर) :– विसापूर येथील क्रीडा संकुलावर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत इन्फंट जीझस इंग्लिश पब्लिक स्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ सादर करून विभागीय स्तरासाठी आपली भक्कम निवड करून शाळेचा मान उंचावला आहे.
विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या इन्फंट काँन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांची नावे व वजन गट पुढीलप्रमाणे – ओम काले – वजन गट -55 वर्ग १० वी, सम्राट प्रमाणिक धामभरे – वजन गट -35 वर्ग ७ वी, नेहारिका शारदा भालमे – वजन गट ओपन वर्ग ८ वी, स्मृती सतीश राजूरकर – वजन गट -40 वर्ग ९ वी, संस्कृती प्रभाकर वासेळार – वजन गट -45 वर्ग ९ वी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव अरुण धोटे, अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, सहायक शिक्षक सुभाष पिंपळकर तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.







