✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.1 सप्टेंबर) :- तालुक्यातील खेमजई येथे स्वर्गीय अनिल गुलाब पोईनकर स्मृती प्रित्यर्थ ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा,ग्रामपंचायत खेमजई व हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माजी कृषी सभापती कन्हैयालाल जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रमोद गंपावार,खेमजई गावच्या सरपंच मनीषा चौधरी, उपसरपंच चंद्रहास मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धोत्रे, ग्रामपंचायत सचिव मेघशाम येंचलवार, भाऊराव दडमल , हेल्पेज इंडिया संयोजिका राशेदा शेख , डॉ. शेख इत्यादी उपस्थित होते.
हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 103 लोकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. यामध्ये बीपी,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर शेख व राशीदा शेख व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले.
या शिबिरात 39 निरोगी रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले.
रक्तदान शिबिरा करता जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांच्या टीमने सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजू श्रीरामे, विनोद पोईनकर,प्रशांत पोईनकर, प्रवीण तुमसरे इत्यादींनी विशेष सहकार्य केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रहास मोरे यांनी तर संचालन रमेश चौधरी यांनी केले.







