करंजखेड फाट्यावर अमरावती उमरखेड बसचा भीषण अपघात

🔸मोटर सायकल स्वार जागीच ठार

✒️विश्वनाथ महामुने महागाव( Mahagaon विभागीय प्रतिनिधी )

महागाव(दि.29 ऑगस्ट) :- एसटी महामंडळाच्या अमरावती वरून यवतमाळ मार्गे उमरखेड कडे आणणाऱ्या एसटी महामंडळ बस आणि मोटरसायकल चालकात महागाव शहरालगत करंजखेड फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या मध्ये करंजखेड येथील मोटारसायकलस्वार युवक जागीच ठार झाला आहे.

अमरावती उमरखेड एसटी महामंडळाची बस क्र. एम. एच. 13 / सी. यु.8727 आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता एस टी महामंडळाच्या गाडी समोर मोटरसायकलचा अक्षरशः बसच्या समोरील चाकामध्ये आल्याने मोटरसायकल चकनाचुर झाली. या अपघातात संजय रमण भांगे हा युवक जागीच ठार झाला आहे. सदर एसटी महामंडळ अमरावती वरून यवतमाळ मार्गे महागाव येथे येत असताना करंजखेड या ठिकाणी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अपघात झाला. मृतक युवकाची डेडबॉडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आली. मृतकाचे नातेवाईक श्रीकांत राऊत यांनी महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

एसटी महामंडळाच्या चालकाने करंजखेड फाटा वळणावर भरधाव वेगाने बस चालून मृतक मोटरसायकल स्वार आपला मेव्हणा संजय रमण भांगे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. बस चालक वाहक यांनी अपघातग्रस्त बस महागाव पोलीस स्टेशन मध्ये जमा केली आहे. वृत्त लिहीपर्यंत कार्यवाहीची प्रक्रिया चालू होती.