सावित्रीबाई फुले विद्यालयाचा अनोखा उपक्रम

🔹लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसद निवडणूक पार पडली

✒️शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी)

माहूर(दि.26 ऑगस्ट) :- सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची ओळख व्हावी, मतदानाचे महत्त्व समजावे, मतदाराचे अधिकार व कर्तव्य कळावे यासाठी शालेय विद्यार्थी संसद निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यासाठी निवडणूक प्रक्रिया दिनांक 6 ते 14 ऑगस्ट दरम्यान विद्यालयात राबवली गेली.

या निवडणुकीची प्रकीया उमेदवारांनी फॉर्म भरणे पासून तर निकालापर्यंतच्या वेळापत्रकाची आखणी करूनच राबवण्यात आली. विद्यार्थ्यांना उमेदवार चिन्ह ,प्रचार, आपले वर्गासंबंधी, शाळेसंबंधी ध्येय धोरण मांडण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियाद्वारे मतदानाचा अनुभव मिळाला .यासाठी प्रत्यक्ष मतदान कक्ष, निवडणूक अधिकारी, चिन्ह, ईव्हीएम ॲपची मांडणी करण्यात आली. शांततेत व सुरळीत ही निवडणूक पार पडली. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा प्रतिनिधी मुली मधुन कु.अस्मिता उडदवाड हीने तर मुलामधुन रोहन जाधव यांनी बाजी मारली.तर माध्यमिक विभागातुन मुलीधुन धनश्री पराये तर मुलामधुन लिखित राठोड यांनी बाजी मारली .

हा उपक्रम प्रा. जयकुमार खराटे सर तथा प्राचार्य जयस्वाल मॅडम यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. प्रत्यक्ष मतदान प्रक्रिये वेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ विमलताई ज्योतिबा खराटे तसेच सचिव श्री ज्योतिबा खराटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. मुख्य निवडणुकअधिकारी म्हणुन प्राचार्या जयस्वाल मँडम यांनी भुमिका पार पाडली. निवडणूक प्रक्रियेसाठी झोनल अधिकारी-1)एन.एम.राठोड सर, 2)प्रा.विनोद कांबळे यांनी कामकाज पाहीले.

नोडल अधिकारी म्हणुन प्रा.पी.जी.सुर्यवंशी,प्रा.पी.आर. बिरादार,डी.पी.रबडे,पी.व्ही.गौड मॅडम,,व्ही.एन.गेडाम,डि.आर मेहेत्रे यांनी कामकाज पाहिले. यासाठी शालेय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी योगदान दिले.